श्रीरामपूर : महसूलमंत्री विखे यांचा श्रीरामपुरात सत्कार

श्रीरामपूर : महसूलमंत्री विखे यांचा श्रीरामपुरात सत्कार
Published on
Updated on

श्रीरामपूर : प्रतिनिधी : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उद्या (रविवार) श्रीरामपूर शहर व तालुका भाजपच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे यांनी दिली. दरम्यान, मंत्रीपदी निवड झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील प्रथमच श्रीरामपुरात येत असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहत्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शहरातील वॉर्ड नं 7 येथील उत्सव मंगल कार्यालयात रविवारी दुपारी 4 वा. हा सत्कार सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थान भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर भूषविणार आहेत.

या सोहळ्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील, विधानपरिषद सदस्य आ. प्रा. राम शिंदे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिकाताई राजळे, भाजप प्रदेश सचिव माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, भाजप अनुसूचित मोर्चा राष्ट्रीय सचिव वैभवराव पिचड, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. चंद्रशेखर कदम, अरुण मुढे, भाजप जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक महेंद्र गंधे, भाजप उत्तर नगर सरचिटणीस नितीन दिनकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे, गिरीधर आसने, प्रकाश चित्ते, मारुती बिंगले, जितेंद्र छाजेड, गौतम उपाध्ये, किरण लुणिया, नानासाहेब पवार, भाऊसाहेब बांद्रे, नानासाहेब शिंदे, नितीन भागडे, शरदराव नवले, बाळासाहेब तोरणे, गणेश मुदगुले, रामभाऊ लिप्टे, विठ्ठलराव राऊत, दत्ता जाधव, शंकरराव मुठे, गणेश राठी, केतन खोरे, सुनील साठे, शंतनु फोपसे, सतीश सौदागर, बाबासाहेब साळवे, अनिल थोरात, प्रफुल्ल डावरे, सुनील वाणी, संदीप चव्हाण, किरण बोरावके, भीमा बागूल, महेंद्र पटारे, संचित गिरमे, सतीश कानडे, दीपक बारहाते, संदीप शेलार आदींनी केले आहे.

मंत्री विखे पाटील यांच्याकडे जनतेचे लक्ष..!
श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण, समाजकारणासह तालुक्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी खमक्या नेत्याची जनतेला प्रतीक्षा होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे नवनिर्वाचित महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्या श्रीरामपूर 'भाजप'च्या वतीने सत्कार स्वीकारणार आहेत. यावेळी आयोजित सभेमध्ये ना. विखे पाटील काय भूमिका घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news