श्रीगोंदा : निंबवीत बसच्या चालक-वाहकांचे स्वागत

श्रीगोंदा : निंबवीत बसच्या चालक-वाहकांचे स्वागत

विसापूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी येथे शिरूर आगारची शिरूर – विसापूर बस नुकतीच सुरू करण्यात आली. या बसच्या चालक – वाहकांचा सत्कार ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. शिरूर आगाराने नुकतीच शिरूर-विसापूर बस सेवा ढवळगाव – कोंडेगव्हाण – निंबवी, पिंपळगाव पिसा – विसापूर मार्गे सुरू केली आहे.

ही बस गेल्या दोन वर्षांपासून कोरोना असल्यामुळे बंद होती. या बसमुळे अहमदनगर व पुणे दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. शिरूर आगाराने सुरू केलेल्या बसमुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती जगताप, सरपंच अप्पासाहेब शिर्के, कुकडी कारखान्याचे संचालक विजय शिर्के, पोलिस पाटील बाळासाहेब गावडे, ग्रामपंचायत सदस्य काका शिर्के, पांडवगिरी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिर्के, राजेंद्र गावडे, अमोल मुरकुटे, हरिश गावडे, पोपट शिर्के आदी ग्रामस्थांच्या हस्ते शिरूर आगाराचे बस चालक-वाहकांचा सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news