वाळकी : अश्लील मेसेज पाठवून मारण्याची धमकी

वाळकी : अश्लील मेसेज पाठवून मारण्याची धमकी

वाळकी : एका पतसंस्थेत काम करणार्‍या 19 वर्षीय तरुणीला वारंवार अश्लील मेसेज पाठवून, तसेच संबंध तोडल्यास चाकूने गळा कापण्याची धमकी देणार्‍या तरुणासह त्याच्या साथीदारावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश लक्ष्मण यादव व विकास सांगळे (दोघे रा. वाकोडी फाटा, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

केडगाव उपनगरातील तरुणी वाकोडी फाटा येथील पतसंस्थेत नोकरीला आहे. काही दिवसांपासून आरोपी आकाश लक्ष्मण यादव हा त्या तरुणीला फोनवर अश्लील मेसेज करत माझ्याशी रिलेशनशिपमध्ये रहा, असे म्हणत त्रास देत होता. त्याकडे तरुणीने दुर्लक्ष केल्याने तो तिला वारंवार मेसेज करू लागला. तसेच फोनही करायचा.

दोन दिवसांपूर्वी त्याने रिलेशनशिप न ठेवल्यास चाकूने गळा कापण्याची धमकी दिली. तसेच त्याचा मित्र विकास सांगळे हा त्या तरुणीला फोन करून आकाशचे फोन उचल, असे सांगत असे. या त्रासाला कंटाळून तरुणीने शुक्रवारी (दि.1) सायंकाळी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news