बेलापूर पशू वैद्यकीय दवाखाना सुरू, पुढारीच्या वृत्ताने तुटले दवाखान्याचे टाळे

संग्रहित
संग्रहित

बोटा : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील ग्रामीण पठार भागातील बेलापूर गावातील पशू वैद्यकीय अधिकार्‍यांची बदली झाल्याने या पशू वैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी शेतकर्‍यांना उपलब्ध होत नसल्याने परिसरातील 15 ते 20 हजार पाळीव जनावरांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जनावरांच्या उपचार संबंधी होणार्‍या गैरसोयबाबत शेतकरी खंत व्यक्त करत होता. या पार्श्वभूमीवर बेलापूर ग्रामस्थांच्या निवासी डॉक्टरच्या मागणीची दखल घेत दैनिक पुढारीने वृत्त प्रकाशित करुन वाचा फोडली.

या बातमीची दखल घेत पशू संवर्धन विभागाने बेलापूर पशू वैद्यकीय दवाखान्यात डॉ. एस.जी. चोभे, परिचर एस.एम. गायकर यांची नियुक्ती करुन, ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली आहे. बेलापूर परिसरात शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांना दवाखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी पंचायत समिती अकोले येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. धिंडाळे, अधिकारी डॉ. डी. डी. भोर, पशुधन पर्यवेक्षक डॉ. एस. जी. चोभे, परिचर एस. एम. गायकर यांनी बेलापूर गावी धाव घेत दवाखान्यातील पाळीव जनावरांच्या सेवेसाठी औषधांचा साठा समाविष्ट करीत पशू दवाखाना पूर्ववत सुरू करुन, शेतकर्‍यांच्या पशू धनासह पाळीव जनावरांना सेवा देण्यात सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

यावेळी विठ्ठल फापाळे.राजेश काळे, गणेश काळे, प्रभाकर शिंगोटे, भिकाजी शिंगोटे, संजय कोकाटे, योगेश महाले, रामदास महाले, भगवान काळे,सुरेश फापाळे, दिनेश मवाळ आदी ग्रामस्थांनी पशू संवर्धन विकास अधिकार्‍यांचा सत्कार केला. यावेळी पशु पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news