प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार ! विधवा प्रथा बंदसाठी नगरपंचायतीचा ठराव

प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार ! विधवा प्रथा बंदसाठी नगरपंचायतीचा ठराव

पारनेर : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या 17 मे रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातील विषयासंदर्भात मंगळवारी पारनेर नगरपंचायतीमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर यांच्या अध्यक्षते खाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती. प्रियंका औटी यांनी या संदर्भात ठराव मांडला. हा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला.

विधवा प्रथेविरोधात अनेक त्यागी समाजसुधारकांनी आवाज उठविला. परंतु त्या विषयीही तीव्र विरोध पहावयास मिळाला. समाजात पतीच्या निधनानंतर सौभाग्या चे लेणे असलेल्या पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगडया फोडणे, पायातील जोडवी काढणे, तसेच धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होता येत नाही.

कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे, म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. तेंव्हा पारनेर शहरासह देशातील विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, या करिता राज्यातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, असे परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे.

आजच्या 21 व्या शतकातही अनेक ठिकाणी या अशा प्रथा पाळल्या जातात की ज्यामुळे महिलांचे जगन्या वावरण्यावर मर्यादा येतात. देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी पारनेर नगरपंचायतने हा धाडसी निर्णय घेतला आहे. विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भात शहरात जनजागृती करावी. त्यासाठीही झालेल्या सभेमध्ये एकमताने मंजुरी देण्यात आलीे.

राज्यातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, असं परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे. हे परिपत्रक 17 मे रोजी जारी करण्यात आले आहे.21व्या शतकातही अनेक ठिकाणी या अशा प्रथा पाळल्या जातात की ज्यामुळे महिलांचे जगन्या वावरण्यावर मर्यादा येतात. देशात विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान सन्मानापासून बाजूला ठेवले जाते. विधवा प्रथा बंद व्हावी व त्या महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी पारनेर नगरपंचायतने हा निर्णय घेतला आहे
सुरेखा भालेकर
उपनगराध्यक्षा, नगरपंचायत, पारनेर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news