पाथर्डीत विद्यार्थ्यांच्या दिंड्यांनी वेधले लक्ष

पाथर्डीत विद्यार्थ्यांच्या दिंड्यांनी वेधले लक्ष

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : आषाढीनिमित्त पाथर्डी शहरातील विविध शाळांनी बाल वारकर्‍यांची दिंडी काढून आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. श्री स्वामी विवेकानंद, श्री तिलक जैन इंग्लिश मीडियम, स्वामी समर्थ विद्या मंदिर, यशवंत पब्लिक स्कूल, जिल्हा परिषद शाळा, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, गर्भगिरी प्री प्रायमरी स्कूल, सावित्रीबाई फुले विद्यालय आदी खासगी व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडी काढण्यात आली. छोट्या-छोट्या बालकांनी केलेली वेशभूषा आकर्षण ठरत होती.

श्री विवेकानंद विद्या मंदिरच्या 80 विद्यार्थ्यांनी अभंगांच्या तालावर लेझीम पथकातून विविध संदेश दिले. संतांसह विठ्ठल-रुक्मिणीचा वेश परिधान करून मोठ्या उत्साहात टाळ-पताकांसह दिंडी सोहळा निघाला. सोहळ्याचे उद्घाटन अभय आव्हाड, सुरेश आव्हाड, वैभव शेवाळे, राजेंद्र कोटकर, धन्यकुमार गुगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ज्ञानेश्वर गायके, मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, रावसाहेब मोरकर आदींनी परिश्रम घेतले.

श्री तिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांची वेशभूषा परिधान करून विठ्ठलाचा गजर करून आषाढी एकादशी साजरी केली. सतीश गुगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्वामी समर्थ विद्या मंदिरचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढण्यात आली. यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सहभागी झाली होती.

सविता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक जयश्री चौधरी, भास्कर गोरे व माजी नगरसेविका सुरेखा रमेश गोरे यांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद शाळा, गर्भगिरी प्री प्रायमरी स्कूल व इतर शाळांच्या बालदिंडीने पथर्डीनगरी दुमदुमली. एम. एम. निर्‍हाळी विद्यालयाचे कलाशिक्षक गणेश सरोदे यांनी विठ्ठलाचे चित्र रेखाटले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news