नेवासा : संत ज्ञानेश्वर दिंडीचे शनिवारी प्रस्थान

नेवासा : संत ज्ञानेश्वर दिंडीचे शनिवारी प्रस्थान
Published on
Updated on

नेवासा : येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातर्फे काढण्यात येणार्‍या नेवासा ते पंढरपूर आषाढी दिंडीचे शनिवारी (दि.25) नेवासा येथून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. नाव नोंदणीसाठी वारकर्‍यांनी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन दिंडी व मंदिराचे मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.

बन्सी महाराज तांबे यांच्या प्रेरणेने व शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार्‍या आषाढी दिंडी सोहळ्याचे शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून सकाळी आठ वाजता निघणार आहे. ती बुधवारी (6 जुलै) पंढरपूरला पोहचणार आहे. सलग 12 दिवस दिंडीचा प्रवास असून, दिंडीच्या वाटेवर सकाळी नाष्टा, दुपारी अन्नदान, मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन व भोजन, असा नित्यक्रम रहाणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या दिंडीत सहभागी होण्यासाठी देवस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, भिकाजी जंगले, ज्ञानेश्वर शिंदे, माधवराव दरंदले, कैलास जाधव, रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news