

नगर : सावली बालगृहातून 17 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसतिगृहाचे अधीक्षक अजिंक्य आंधळे (27), यांनी फिर्याद दिली आहे. केडगाव भागात संकल्प प्रतिष्ठान संचलित सावली बालगृह आहे.
(दि.22) जून रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान बेपत्ता झालेला मुलगा खाणावळीत जेवणासाठी आला नसल्याची माहिती केअर टेकर यांनी अधीक्षक यांना सांगितली. त्यानंतर अधीक्षक यांनी केडगाव परिसर, रेल्वे स्थानक, बसस्थानक या ठिकाणी मुलाचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नसल्याने कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.