नगर : संविधान स्तंभ चौकात 100 फूट तिरंगा ध्वज

जामखेड : संविधान स्तंभ चौकात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला 100 फूट तिरंगा. (छाया : दीपक देवमाने)
जामखेड : संविधान स्तंभ चौकात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला 100 फूट तिरंगा. (छाया : दीपक देवमाने)

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष अतिशय उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आमदार रोहित पवार यांनी अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जामखेड शहरातील संविधान स्तंभ चौकात 100 फूट उंच तिरंगा उभारण्यात आला.

मतदारसंघातील वीरमाता, शासकीय अधिकारी व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा भव्य तिरंगा फडकविण्यात आला. मतदारसंघात आमदार पवार कायमच वेगवेगळे उपक्रम हाती घेता आहेत. यावेळीही त्यांनी याच उद्देशाने समता, बंधुता व एकात्मता उन्नत राखण्यासाठी 100 फूट उंच तिरंगा उभारला आहे.

या सोहळ्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थित होती. याशिवाय कायमच आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे चर्चेत असणारे रोहित पवार आणखी एका आगळ्यावेगळ्या आणि अनोख्या उपक्रमामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघात पहिल्यांदाच अशाप्रकारे एवढा उंच तिरंगा ध्वज आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आला.

मनसेतर्फे आमदार पवारांचा सत्कार

जामखेड शहरामध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आमदार रोहित पवार यांनी जामखेडच्या वैभवात भर घालत 100 फुटी तिरंगा ध्वज उभारला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, कुसडगावचे माझी सरपंच बापूसाहेब कार्ले, मनसेचे तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news