नगर : शिबलापूर-पानोडी रस्त्याची झाली दुरवस्था

संगमनेर : शिबलापूर ते पानोडी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे.
संगमनेर : शिबलापूर ते पानोडी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे.

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पूर्व व पठार भागातील अति महत्त्वाचा समजला जाणारा शिर्डी ते पुणे 67 क्रमांकाच्या राज्य महामार्गावरील पानोडी घाटासह शिबलापूर ते पानोडीपर्यंतचा खड्डेमय व अरुंद रस्त्याच्या कामाला मंजुरी असताना गेल्या वर्षभरात रस्त्याच्या कामाला मुहुर्तच न मिळाल्याने प्रवाशांवर काय रस्ता? काय डबकी? काय शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे हाल! हा म्हणण्याची वेळ आल्याने हाच बांधकाम विभागाचा अजब कारभार का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

राज्य महामार्ग क्र. 67 हा शिर्डी ते पुणे घोषित झाला. बहुतांश रस्त्याचे रुंदीकरण झाले. मात्र, पानोडी घाटासह स्थापलिंग घाट ते हणमंत नाका, शिबलापूर ते पानाडी घाट पायथ्यापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीस मुहूर्तचं सापडत नाही.

तालुक्यातील पूर्व भागावर राज्य पातळीवरील वजनदार दोन नेत्यांचावर चष्मा असताना सुद्धा मंजूर असलेला रस्ता अजूनही दुरुस्त होईना. कौठे – मलकापूर येथे चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या साखर कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ निर्माण झाल्याने अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास होऊ लागल्याने श्री गजानन शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनाने रस्ता खराबीमुळे होणारे अपघात, लोकांना होणारा त्रास ओळखून पानोडी घाट दुरुस्त व घाटाच्या पुढे – मागे असणारा 10 कि. मी. चा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा, म्हणून सातत्याने पाठपुरावा केल्याचे दिसून आले. त्या पाठपुराव्याला यशही आले. अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news