नगर : वेबसाईटच्या नाम साधर्म्यातून साईभक्तांची फसवणूक

नगर : वेबसाईटच्या नाम साधर्म्यातून साईभक्तांची फसवणूक

शिर्डी, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील एका भाविकाने श्रीसाईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासासाठी खोली आरक्षित केली होती, मात्र श्रीसाई संस्थानच्या द्वारावतीची भक्त निवासाची फेक वेबसाईट असल्याचे निदर्शनास आल्याने श्रीसाई संस्थानच्या आयटी विभागाने नाम साधर्म्य असलेल्या या वेबसाईटमुळे साई भक्तांची फसवणूक झाल्याची फिर्याद शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

शिर्डी पोलिस ठाण्यात श्रीसाई संस्थानच्या आयटी विभागाच्या वतीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुंबईतील जय शर्मा हे गृहस्थ ऑनलाईन श्रीसाई बाबांच्या दर्शनाला येणार होते. त्यासाठी श्रीसाई संस्थानची द्वारावती भक्त निवासाची खोली आरक्षित करण्यासाठी साई संस्थानचे नाम साधर्म्य असलेल्या एका वेबसाईटवर खोली आरक्षित केली होती. शिर्डीत आल्यानंतर शर्मा हे द्वारावती भक्तनिवसात आरक्षित खोली घेण्यास गेले, मात्र त्यांच्या नावे द्वारावती भक्तनिवासात खोली आरक्षित नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर शर्मा यांनी त्या नाम साधर्म्य असणार्‍या वेबसाईटवर जाऊन संपर्क नंबर शोधला. त्यावर चौकशी केली असता, त्या क्रमांकावरून त्यांना उडवा- उडावीची उत्तरे देण्यात आली. आपण फसलो गेलो आहोत, अशी शर्मा यांना खात्री पटली. दरम्यान, ही माहिती श्रीसाई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना समजली. त्यांनी तत्काळ आय टी विभागाला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

श्रीसाई बाबा संस्थानकडून साईभक्तांना वारंवार आवाहन करण्यात आलेले आहे की, श्री साईबाबा संस्थानची ेपश्रळपश.ीरळ.ेीस.ळप ही वेबसाईट आहे. त्याचबरोबर (02423) 258775,258960,258500 हे फोन क्रमांक अधिकृत आहेत. श्रीसाई संस्थांनच्या कुठलाही सुविधेविषय माहिती पाहिजे असेल तर या वेबसाईट आणि फोन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीसाई संस्थांनच्या वतीने साईभक्तांना करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news