

कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरासह परिसरातील बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोपरगाव चेस व स्पोर्टस् क्लबच्या वतीने 3 व 4 सप्टेंबर रोजी विवेक कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल, ग्रामीण रुग्णालयाजवळ, कोपरगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. 14 वर्षांखालील गट, 19 वर्षांखालील गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक- अध्यक्ष सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना अध्यक्ष, युवा नेते विवेक बिपीनराव कोल्हे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेसाठी तीनही गटांत प्रत्येकी 10 अशी एकूण 30 बक्षिसे रोख स्वरुपात आणि 8 चषक (ट्रॉफी) व 24 बक्षिसे चषक (ट्रॉफी) अशी आहेत. बक्षिसे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने होईल. सहभागी होणार्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी शांता मेडिकल, गांधी चौक, यशश्री बंगला, कोर्ट रोड, कोपरगाव येथे 2 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदावे. स्पर्धकांनी संकेत गाडे (मो.7057693001) किंवा महेश थोरात (मो.9422667792) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकांनी स्वतःचा चेस बोर्ड आणावा.
स्पर्धेसाठी नितीन सोळके, राजेंद्र कोळपकर, प्रमोद वाणी, यश बंब, नितीन जोरी, लक्ष्मण सताळे, संदीप कवडे, वैभव सोमासे, राजीव बोधक, राहुल कवरे, नितेश बंब, निखील धोंगडी, नूपुर संचेती, कचेश्वर गुजर, राधेशाम मालजी, अथर्व थोरात, तन्मय महाजन, विशाल पंडोरे आदी प्रयत्नशील आहेत.