पुणे विभागात सोलापूर अव्वल; नगर तिसर्‍या स्थानी!

पुणे विभागात सोलापूर अव्वल; नगर तिसर्‍या स्थानी!
Published on
Updated on

नगर : विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये 12 वी प्रमाणेच 10 वीच्या परीक्षेतही सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 97.74 टक्के लागला आहे. त्याखालोखाल पुणेचा 96.77 टक्के निकाल असून, सर्वात कमी हा नगर जिल्ह्याचा निकाल 96.58 टक्के इतका लागल्याचे दिसले. सोलापूर जिल्ह्यातून 66 हजार 652 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

त्यापैकी 63 हजार 196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. पुणे जिल्ह्यातून एकूण 1 लाख 32 हजार 847 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 28 हजार 567 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नगर जिल्ह्यातून 68 हजार 901 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 66 हजार 549 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. 10 वीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व कायम दिसले.

जिल्हानिहाय निकाल पुणे – 96.77
अहमदनगर – 96.58
सोलापूर – 97.74

– तालुकानिहाय निकाल –
नगर ः 97.26 टक्के
परीक्षार्थी 10 हजार 142
उत्तीर्ण 9 हजार 865
राहाता ः 96.12 टक्के
परीक्षार्थी 5 हजार 157
उत्तीर्ण 4 हजार 957
संगमनेर ः 97.13 टक्के
परीक्षार्थी 7 हजार 126
उत्तीर्ण 6 हजार 922
कर्जत ः 96.71 टक्के
परीक्षार्थी 3 हजार 440
उत्तीर्ण 3 हजार 337
शेवगाव ः 97.09 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 127
उत्तीर्ण 4 हजार 007
राहुरी ः 95.61 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 172
उत्तीर्ण 3 हजार 989
पारनेर ः 97.76 टक्के
परीक्षार्थी 3 हजार 981
उत्तीर्ण 3 हजार 892
श्रीगोंदा ः 97.25 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 478
उत्तीर्ण 4 हजार 355
पाथर्डी ः 95.53 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 452
उत्तीर्ण 4 हजार 253
जामखेड ः 96.44 टक्के
परीक्षार्थी 2 हजार 307
उत्तीर्ण 2 हजार 225
नेवासा ः 96.07 टक्के
परीक्षार्थी 5 हजार 731
उत्तीर्ण 5 हजार 506
कोपरगाव ः 95.03 टक्के
परीक्षार्थी 5 हजार 195
उत्तीर्ण 4 हजार 937
अकोले ः 98.36 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 394
उत्तीर्ण 4 हजार 322
श्रीरामपूर ः 86.76 टक्के
परीक्षार्थी 4 हजार 199
उत्तीर्ण 3 हजार 992

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news