नगर : वाहून गेलेला रस्ता 24 तासांत दुरुस्त

अळकुटी : पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडीला जोडणारा रस्ता वाहून गेला होता. आमदार नीलेश लंके यांनी तातडीने दुरुस्त करून दिला.
अळकुटी : पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडीला जोडणारा रस्ता वाहून गेला होता. आमदार नीलेश लंके यांनी तातडीने दुरुस्त करून दिला.
Published on
Updated on

पारनेर / अळकुटी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील म्हस्केवाडी येथील पिलानी वस्ती रस्त्यावरील नदीला अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे रस्ता वाहून गेला. आमदार नीलेश लंके यांनी 24 तासांत दुरुस्त करून दिला.

रस्त्याच्या दुर्दशेबद्दल पिलानी वस्तीवरील नागरिकांचा संपर्क तुटला होता. म्हस्केवाडीचे सरपंच डॉ. किरण पानमंद व उपसरपंच गोविंद साबळे, सावळा पानमंद, अविनाश पानमंद, सुदाम म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, भाऊसाहेब गोरडे, अरुण गोरडे, गणेश गोरडे, संदीप म्हस्के, साहेबराव पानमंद आदींसह पिलामी वस्ती, भंदे वस्तीवरील संबंधित म्हस्केवाडी ग्रामस्थांनी लोकांची अडचण आमदार नीलेश लंके यांच्यासमोर मांडली. क्षणाचाही विलंब न करता कुठलाही निधी उपलब्ध नसताना आमदार लंके यांनी मळगंगा कन्स्ट्रक्शनला तत्काळ सदर ओढ्यामधे नळ्या टाकून रस्त्याची सोय करण्यास सांगितले.

ठेकेदाराने संपूर्ण यंत्रणा त्या रस्त्यासाठी उपलब्ध केली. वाहून गेलेल्या या रस्त्यावरील नदीत सिमेंट काँक्रीटचे पाईप टाकून पुलाचे काम करत वस्तीवरील रस्त्याची समस्या तात्पुरती दूर केली. तात्पुरते काम केले असले, तरी भविष्यात पाणी बंद झाल्यानंतर एक दर्जेदार पुलाचे काम करण्याचा शब्द यावेळी आमदार लंके यांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून असलेली रस्त्याची गैरसोय दूर केल्याबद्दल आमदार नीलेश लंके यांचे सरपंच किरण पानमंद व म्हस्केवाडी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news