

नगर : पुढारी वृत्तसेवा : पाईपलाईन रोडवरील यशोदा नगरात घरफोडी झाल्याची घटना (दि.16) रोजी घडली. घरफोडीत 86 हजार 500 किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. सुयोग दत्तात्रय कुरूंद (रा. साई निवारा टॉवर्स, यशोदानगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दि.16 रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.30 घरी नसताना घराचे कुलूप तोडून 86 हजार 500 किंमतीचे दागिने चोरूट्यांनी चोरून नेले. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ गिरी करत आहेत.