नगर : ‘मुळा’च्या पाणलोटात संततधार

राहुरी : मुळा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, दुथडी भरून वाहताना मुळा नदीचे पात्र.
राहुरी : मुळा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, दुथडी भरून वाहताना मुळा नदीचे पात्र.

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा संततधार सुरूच आहे. धरणाकडे 8 हजार 28 क्युसेक वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे. धरणसाठा 11 हजार 623 दलघफू (44.70 टक्के) झाल्याची नोंद दि. 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता नोंदविण्यात आली.

मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड, पांजरे, कोतूळ परिसरात आषाढसरींचा वर्षाव सुरूच आहे. परिणामी धरणसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ होताना दिसत आहे. मुळा धरणाचे लाभक्षेत्र व पाणलोट क्षेत्रावर सतत पडणार्‍या पावसाने ओलावा निर्माण झाला आहे. धरण साठ्यातही वाढ होत असून लवकरच 26 हजार दलघफू क्षमता असलेले मुळा धरण निम्मे भरेल, अशी अपेक्षा वाढली आहे.

दि. 8 जुलैपासून मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये नवीन पाणी जमा होण्यास प्रारंभ झाला. मान्सून पूर्व हंगामाने वरुणराजाने दडी मारल्यानंतर त्याची भरपाई आषाढसरींनी काढून दिली आहे. गेल्या पंधरवड्यात मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात पावसाची मोठी कृपा झाली आहे. परिणामी मुळा धरणामध्ये 3 हजार 392 क्युसेक वेगाने नवीन पाणी जमा झाले आहे. कोतूळसरिता मापन केंद्राकडून होणारी नवीन पाण्याची आवक धरणाच्या लाभक्षेत्रासाठी लाभदायी ठरणारी आहे. त्यानुसार कमी-जास्त प्रमाणात नवीन पाणी जमा होत असल्याकडे मुळा पाटबंधारे विभागाचे लक्ष लागले आहे.

मुळा धरण आज निम्मे भरणार बुधवारी (दि. 13) सायंकाळी 6 वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा 11 हजार 623 दलघफू झाल्याची नोंद झाली आहे. सायंकाळी धरणाकडे 8 हजार 28 क्युसेक वेगाने नवीन पाण्याची आवक होत होती. मुळा धरणात अजून दीड टीएमसी पाणी जमा झाल्यानंतर धरण निम्मे भरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news