नगर : मनपात आढळले 88 ‘लेट लतिफ’

नगर : मनपात आढळले 88 ‘लेट लतिफ’

नगर, पुढारी वृत्तसेवा : नूतन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारी सर्वच विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन झाडाझडती घेतली. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी मंगळवारी (दि.19) सकाळी मनपा कार्यालयात कर्मचार्‍यांचे हजेरी पत्रक तपासले. त्यात 88 कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले. यापुढे कोणी उशिरा असल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. जावळे यांनी कर्मचार्‍यांना शिस्त लागवी आणि सामान्य नागरिकांचे काम तत्परतेने व्हावे, या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. महापालिका कार्यालयाची वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी आहे. त्यात अनेकदा कर्मचारी उशिरा येत असल्याचे आढळून येत होते. त्यात काही कर्मचारी नेतागिरी करीत होते. याबाबत 'दै. पुढारी'ने ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. नूतन आयुक्त जावळे यांनी महापालिकाचा आढावा घेतल्यानंतर पहिली मोहीम कर्मचार्‍यांच्या शिस्तीची राबविली.

अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी मंगळवारी महापालिकेच्या सर्वच कार्यालयात कर्मचार्‍यांची हजेरी तपासली. त्यात सुमारे 88 कर्मचारी उशिरा कामावर हजर झाल्याचे दिसून आले. संबंधित सर्वच कर्मचार्‍यांना तत्काळ नोटीस देऊन समज देण्यात आली. यामध्ये आयुक्तांसह उपायुक्तांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यापुढे वेळेवर हजर न रहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

बायोमेट्रिक हजेरी सुरू

महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून बायोमेट्रिक हजेरी सुरू नव्हती. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत तत्काळ बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news