नगर: मनपा शिबिरांत 174 पिशव्यांचे संकलन

नगर: मनपा शिबिरांत 174 पिशव्यांचे संकलन

नगर : पुढारी वृत्तसेवा: जागतिक रक्तदाता दिनानिमित्त (14 जून) मनपाच्या कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीच्या रक्तदान शिबीर मोहिमेत 174 रक्तपिशव्यांचे संकलन झाले. मनपा रक्तपेढी मार्फत दि. 8 जून ते 21 जून अशी सलग 15 दिवसांची रक्तदान शिबीर मोहीम राबविण्यात येत आहे.

प्रारंभी दि. 8 रोजी कोतवाली पोलिस ठाणे, दि. 11 रोजी तोफखाना पोलिस ठाणे, सावेडीत दि. 14 रोजी स्वाभिमानी तांत्रिक कर्मचारी संघटना, दि. 17 रोजी मोबाईल असोसिएशनच्या सहकार्याने रक्तदान शिबीरे घेण्यात आली. या शिबिरांना रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 174 रक्तपिशव्यांचे संकलन झाले.

कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, पो.कॉ. खताडे, तोफखान्याच्या पो. नि. ज्योती गडकरी व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. स्वाभिमानी तांत्रिक कर्मचारी संघाचे सचिव किशोर काळे, मोबाईल असोसिएशनचे सहकार्य मिळाले. दि. 21 रोजी शनिशिंगणापूर येथे रक्तदान शिबीर होत आहे. या मोहिमेमुळे पेढीच्या रक्तसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. शिबीर मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डॉ. शंकर शेडाळे, डॉ. सोमनाथ नंदकर, देविदास परभाणे, पल्लवी मोरे, हसन बिन तालेब बासाद, शेख नईम युसूफ, निशा अन्सारी, योगीता गायकवाड आदी कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news