नगर : बेलापूरचा पशुवैद्यकीय दवाखाना कुलूप बंद

बोटा : पशू वैद्यकीय अधिकारी विना दवाखाना कुलूप बंद. (छाया : सतीश फापाळे)
बोटा : पशू वैद्यकीय अधिकारी विना दवाखाना कुलूप बंद. (छाया : सतीश फापाळे)

बोटा, पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील ग्रामीण पठार भागातील बेलापूर गावातील पशू वैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी अथवा कर्मचारी कार्यरत नसल्याने हा पशुवैद्यकीय दवाखाना 'कुलूप बंद' असल्याने हजारो पाळीव जनावरे उपचाराविना वंचित आहेत.

बेलापूर परिसरातील जाचकवाडी, पवारवाडी, गोपाळवाडी, मोघडवाडी, भक्ताचीवाडी अशा अनेक गावांसह वाडी, वस्तीवरील शेतकरी बांधवांची साधारण 15 ते 20 हजार पाळीव जनावरे आहेत. सध्या पावसाळा चालू असल्याने अनेक आजारांच्या विळख्यात ग्रासलेल्या पाळीव जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात शेळी, गाय, बैल, म्हैस आदी पाळीव जनावरांना विविध आजार होत आहेत. या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने विविध जनावरे आजाराने ग्रासून मयत होत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकर्‍याच्या अडचणीत वाढ होत असून यात भर पडत चालली आहे.

इमरात फक्त शोभे पुरती!

बेलापूर गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून पशू वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याचे पशुपालक चर्चा करीत आहे. आधीच शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यात दुधाच्या भावात चढ-उतार आणि जनावरांच्या खाद्याचा खर्च यात आणखी जनावरांच्या आजारात होणारा खर्च याने शेतकरी हैराण झाले आहेत. यात जनावरांच्या आजारात सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी मिळत नाही. त्यामुळे जनावरांवर इतर डॉक्टरांकडून उपचार करणे, शेतकर्‍यांना न परवडणारे आहे. बेलापूर गावात सुसज्ज अशी पशुवैद्यकीय इमारत आहे. परंतु त्यात पशुवैद्यकीय अधिकारी शेतकर्‍यांना उपलब्ध होत नसल्याने ही इमारत फक्त शोभेची बाहुली बनली आहे.

शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनचा व्यवसाय करतो. या जनावरांचा जेव्हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात. पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आहे.
अनेक प्रकारची वेगवेगळी उत्तरे शेतकर्‍यांना देऊन आपल्या कर्तव्यावर दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी पशुपालक खंत व्यक्त करीत आहेत.

गेली अनेक दिवसांपासून आम्हाला पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले नाही. वारंवार प्रशासनास 'आम्हाला निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावे,' अशी मागणी केली. परंतु प्रशासन आमची मागणी गांभीर्याने घेत नाही. परिसरातील हजारो पाळीव जनावरांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यास प्रशासन आणि संबंधित आधिकारी जबाबदार आहे, तरी प्रशासनाने आम्हास निवासी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावे. नसेल होत, तर आम्ही येत्या काही दिवसांत उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहोत.

                                                                               – पशुपालक, सुरेश फापाळे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news