नगर : बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार

अकोले : बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांना निवेदन देताना ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक आदी.
अकोले : बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांना निवेदन देताना ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक आदी.
Published on
Updated on

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अंगणवाडीला पुरवठा करण्यात येत असलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे निवेदन ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब हाके यांना देण्यात आले.

कोरोनाचा काळ कमी झाल्यामुळे अंगणवाडीत मुले येत आहेत. त्यांना पोषण आहार देण्यात येतो, परंतु तो निकृष्ट दर्जाचा मिळत आहे. सदरचा पोषण आहार ठेकेदारामार्फत पुरविण्यात येतो. सदरचा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने बालकांना घातक ठरू शकतो. याबाबत महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी पर्यवेक्षिका (सुपरवायझरने) माहिती दिली नाही ती मिळाल्यावर सांगू.

अंगणवाडी सेविकांना एकतर मानधन कमी आहे. गॅस टाकी भरण्यासाठी 1100 रुपये लागतात. प्रत्यक्ष मात्र एका मुलामागे 65 पैसे मिळतात. गॅस टाकी भरण्यासाठी एवढे पैसे आणायचे कोठून? तांदूळ, हरभरा, गहू, मसूर, चनाडाळ, गूळ, तेल, हळद पावडर, मिरची पावडर इत्यादी कच्चा कोरडा आहार पुरवला जातो. संबंधित ठेकेदार ट्रकमधील वजन काट्यावर मोजू दिला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news