

करंजी, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील शिराळ, कोल्हार, तिसगाव, जोडमोहज, त्रिभुवनवाडी गावांमधील अनेक बंधारे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटून गेले होते. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या भागातील 12 बंधार्यांची दुरुस्ती करून दिल्याने केले. अनेक बंधारे यावर्षी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरल्याने परिसरातील लाभधारक शेतकर्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शिराळ, कोल्हार, तिसगाव या गावांमध्ये प्रमुख्याने वेळेत बंधारे दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यामुळे या भागातील बंधारे पावसामुळे भरले आहेत. आमदार तनपुरे यांनी या बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी वेळेत निधी उपलब्ध केल्यामुळे या बंधार्यांची दुरुस्ती करणे शक्य झाले. या भागात झालेल्या पावसामुळे सर्व बंधार्यांमध्ये पाणी साचल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात असल्याची माहिती माजी सभापती संभाजी पालवे, शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, तिसगावचे युवानेते भाऊसाहेब लवांडे यांनी दिली आहे.
दरम्यान, या परिसरात यंदा समाधानकारक पाऊस होत असून, खरिपाची पिके जोमदार आली आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विहिरींनाही पाझर फुटला असून, कूपनलिकांची पाणी पातळी वाढली असून, बंधार्यांमध्ये पाणी साठले आहे. बंधारा दुरुस्त केल्यामुळे शेतकर्यांना चांगला फायदा होणार आहे.