नगर : पाथर्डीत कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध

पाथर्डी : शिवसेनेचे भगवान दराडे यांच्या नेतृृत्वाखाली प्रांत अधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन देण्यात आले. (छाया : अमोल कांकरिया)
पाथर्डी : शिवसेनेचे भगवान दराडे यांच्या नेतृृत्वाखाली प्रांत अधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन देण्यात आले. (छाया : अमोल कांकरिया)

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आकस बुद्धीने केलेली अटक व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक पदावरून महाराष्ट्र व मराठी माणसाचा अपमान करून प्रांतीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनांचा तालुका शिवसेनेतर्फे निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

याबाबत उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर व पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, उप तालुकाप्रमुख उद्धव दुसंग, शिवसेना प्रणित दलित महाआघाडीचे अंबादास आरोळे, शिवसेना शहरप्रमुख सागर राठोड, भाऊसाहेब धस, सुनील परदेशी, अक्षय उराडे, संभाजी जेधे, आजिनाथ गीते, सुरेश हुलजुते, अनिल भापकर, आजिनाथ भापकर, भागिनाथ गवळी, आदर्श काकडे आदी उपस्थित होते.

दराडे म्हणाले, शिवसेनेची बुलंद तोफ खासदार राऊत यांच्यावर केंद्र सरकारने इडीची चौकशी लावून त्यांना अटक केली. शिवसैनिकांचा आवाज दाबण्याचे काम केंद्राकडून होत आहे. भाजपने कितीही शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तो आवाज कधीच दबणार नाही, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आमच्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी दिलेली राजकारण, समाजकारणाची शिदोरी आहे. ही शिदोरी घेऊन आम्ही राजकीय आखाड्यात दोन हात करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे अशा केंद्राच्या या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करतो. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान करून प्रांतवाद निर्माण केला. त्यांच्या या अशा वक्तव्याचा तीव्र निषेध करून त्यांचाही आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो, असेही दराडे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news