

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यस्तरावरून 574 ग्रामपंचायती पैकी 77 ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. यामध्ये मिरजगाव (ता.कर्जत) ग्रामपंचायतीने राज्यात पर्यावरण संवर्धनात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. माझी वसुंधरा अभियान-2 अंतर्गत भूमि, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली.
माझी वसुंधरा अभियान- 2 मधील नगर जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्तम झाली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पाणी व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले.
'माझी वसुंधरा अभियान-2' मध्ये जिल्ह्यातील 574 ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता. या ग्रामपंचायतींनी सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती, विविध स्पर्धांचे आयोजन, सवांदाचे उपक्रम राबवून वर्षभर जनजागृती करण्यात आली. पर्यावरण संवर्धनचे पारितोषिक व सन्मान मिरजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता खेतमाळस, ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे, कर्जत पंचायत समितीचे ग्राम विकास अधिकारी अमोल जाधव, नितीन खेतमाळस, ग्रामपंचायत कर्मचारी निशांत घोडके आदी उपस्थित होते.