नगर : पतसंस्था, मेडिकल, दुकाने फोडली

नगर : पतसंस्था, मेडिकल, दुकाने फोडली
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : केडगाव उपनगरातील भूषणनगरमधील झेंडात चौकात शनिवारी रात्री चोरांनी एकाच वेळी मेडिकल, पतसंस्था व क्लासेसचे ऑफिस फोडून 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केडगाव उपनगरातील भूषणनगर झेंडा चौकातील राजमुद्रा मेडिकलचे शर्टर उचकटून चोरांनी आतप्रवेश केला.

मेकिडलच्या गल्ल्यातील 9 हजारांची रोकड चोरून नेली. त्यानंतर चोरांनी कुलांगे क्लासेसकडे मोर्चा वळविला. क्लासेसचा दरवाजा तोडून टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले 41 हजार रुपये चोरून नेले. तर, शेजारी असणारी राजीव गांधी पतसंस्थेचे शर्टर उचकटून चोरांनी आतप्रवेश केला. मात्र, त्यांना काहीही हाती लागले नाही. चोरांनी सुमारे 50 हजारांचा ऐवज घेऊन पोराबा केला.

दरम्यान, चोरीच्या घटनेची माहिती समजल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक बोलावून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार बाळासाहेब इखे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news