

नगर : नेप्ती रोडवरील पाटील कॉलनी येथील विश्वलक्ष्मी हॉटेल व बारमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. एकवीस हजार रूपयांचा माल चोरून नेला असून, कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मच्छिंद्र विश्वनाथ पठारे (43, रा. केडगाव, पठारे कॉलनी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना (दि.25) रोजीच्या रात्री घडली आहे. हॉटेलच्या मागील दरवाज्याचे कुलूप तोडून व खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. अकारा हजार किंमतीच्या बियर, सात हजार रोख, दोन हजारांची चिल्लर, एक हजार रूपये जमा असलेली गोशाळा दानपेटी असा एकूण एकवीस हजार 26 रूपयांचा माल चोरीला गेला आहे. कोलवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.