नगर : निधीअभावी रखडले शहर सुशोभीकरण

नगर : निधीअभावी रखडले शहर सुशोभीकरण
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : भारत स्वच्छ अभियानांतर्गत शहरातील उद्याने, वालकंपाऊंड, झाडांचे खोड सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, निधीअपुरा पडल्याने गेल्या काही दिवसांपासून शहर सुशोभीकरणचे काम रखडले आहे.

महापालिकेला नुकताच माझी वसुंधरा अभियानांतर्गत 'अमृत' गटात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यातील सहावा पुरस्कार मिळाला. मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापौर रोहिणी शेंगडे, उपमहापौर व अधिकार्‍यांनी पुरस्कार स्वीकारला. यापूर्वीही महापालिकेला राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार मिळालेले आहेत.

सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात सुशोभीकरण सुरू आहे. शहरातील नागरिकांची जनजागृती व्हावी, यासाठी शहरात भिंती, पाण्याच्या टाक्या, झाडांची खोडे रंगविणे, तसेच टाकाऊ पदार्थापासून टिकावू वस्तू बनविणे, सफाई मित्र चालेंज योजनेंतर्गत घनकचरा गोळा करणार्‍या वाहनांवर जनजागृतीचे स्टिकर चिकटविणे, पाण्याच्या टाक्या रंगविणे अशी कामे केली जातात. त्यासाठी बजेटमध्ये तरतुद केली जाते. यासाठी आर्थिक वर्षात बजेटमध्ये लाखो रुपयांची तरतूद केली होती. मात्र, साठ लाख रुपयांचा निधी खर्च होऊन अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्या कामासाठी आता निधी अपुरा पडला आहे.

शहरात साधारण 21 ठिकणी भिंती, पाण्याच्या टाक्यांवर पेटिंग केले आहे. त्यात सुंदर पेटिंगमधून नागरिकांनी जनजागृती होत आहे. मात्र, 21 ठिकाणी पेटिंग केल्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वॉलकंपाऊंडवर पेटिंग करण्यासाठी निधी अपुरा पडला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने काम बंद केले आहे. पेटिंगसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे.

इथे झाले सुशोभीकरण

पवननगर, संत नामदेव नगर, गोविंदपुरा, आनंदनगर, देना अँबन कॉलनी, धर्माधिकारी मळा, पितळे कॉलनी, बागरोजा हडको, महावीर नगर, कराचीवाला नगर, सथ्था कॉलनी, मेहेर कॉलनी, प्रभात कॉलनी, साईनगर कॉलनी, भंडारी चौक भूषणनगर, मोहिनीनगर, चाणक्य चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, वाडिया पार्क, साई उद्यान, महालक्ष्मी उद्यान, सिद्धीबाग, पाण्याची टाकी जुने आरटीओ ऑफिस, सारसनगर, कल्याण रोड, भूषणनगर.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत मनपा पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराचे दीड कोटी रुपये मिळणार असून, त्यातून उर्वरित शहर सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

                                                          – यशवंत डांगे, उपायुक्त, महानगरपालिका

वॉलकंपाउंडवर अत्यंत सुंदर पेटिंग करण्यात आले आहे. त्यातून शहराच्या वैभवात भर पडली आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या भिंतीवरील पेटिंग निधीअभावी रखडले आहे. त्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा.

                                                               – मुदस्सर शेख, नगरसेवक, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news