नगर : दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक जखमी

नगर : दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक जखमी
Published on
Updated on

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात दोन दुचाकींच्या धडकेत झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. युवकाच्या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे शिवारात हॉटेल अराध्यानजीक बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या अपघातात दुचाकी स्वार अमोल अशोक दिघे (वय 31 वर्ष, रा. तळेगाव दिघे) हा युवक जागीच ठार झाला. दुसरा दुचाकीस्वार अमोल निवृत्ती दिघे जखमी झाला.

दरम्यान, जखमी युवकांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच अमोल दिघे या युवकाचा मृत्यू झाला होता. या अपघाताचा तपास तालुका पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news