नगर : दीड हजार किमीचे पाणंद रस्ते; विरोधकांना पोटशूळ

नगर : दीड हजार किमीचे पाणंद रस्ते; विरोधकांना पोटशूळ
Published on
Updated on

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपूर्वी आमदार राम शिंदे यांनी पाणंद रस्त्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्याला उत्तर म्हणून आमदार रोहित पवार यांनी विरोधक नैराश्यातून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिंदे यांचे नाव न घेता केला. त्यामुळे दोन्ही आमदारांच्या आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.

गेल्या दहा वर्षांत अपेक्षित रस्त्यांची कामे होणे गरजेचे होते; परंतु ते रस्ते झाले नाहीत. मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता. तरीही अडीच वर्षांत कर्जत-जामखेड मतदारसंघात दीड हजार किलोमीटरचे पाणंद रस्ते पूर्ण झाल्याने रस्त्यांवरून सुरू असलेली धूळफेक, विरोधकांची पोटशूळ आहे. दहा वर्षे काहीही न केलेल्या कामाचा फुगा फुटल्याने नैराश्यातून लोकांची दिशाभूल केली जातेय. परंतु, कर्जत-जामखेडकर नागरिक कुठल्याही भूलथापांना बळी पडत नाहीत. हे अडीच वर्षांपूर्वीच दिसले आहे. त्यामुळे मागील दाराने आलेल्या कुणी कितीही रडारड केली, तरी त्याचा उपयोग नाही.

सामान्य माणूस आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मी यापुढेही लढत राहिल आणि अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे, आमदार रोहित पवार यांनी सांगितले. दीड हजार किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे पाणंद रस्ते तयार झाले असून, याचा एक लाख 80 हजार पेक्षाही अधिक लोकांना फायदा होत आहे. 2020-21 मध्ये 'पालकमंत्री पाणंद रस्ते योजने'अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, तसेच मविआ सरकारच्या काळातील 'मातोश्री पाणंद रस्ते योजने'अंतर्गत शेत वहिवाटीचे रस्ते तयार केले. मंजूर कामांपैकी कर्जत तालुक्यात 423 आणि जामखेड तालुक्यात 476 पाणंद रस्त्यांचे मातीकाम आणि मुरमीकरण पूर्ण केले. यातून कर्जत तालुक्यात 711.5 किलोमीटर, तर जामखेड तालुक्यात 829 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झाले. या रस्त्यांचा कर्जत तालुक्यातील एक लाख 22 हजार, तर जामखेड तालुक्यातील 56 हजार, अशा जवळपास एक लाख 80 हजार नागरिकांना फायदा होत आहे, असे आ. पवार यांनी सांगितले.

'कमी खर्चात उत्तम प्रतीचे रस्ते करून दाखविले'

मतदारसंघातील नागरिक, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समन्वयामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांची कामे झाली. विशेष म्हणजे राज्यात अन्य ठिकाणी आणि कर्जत-जामखेड तालुक्यात पाणंद रस्त्यांच्या एक किलोमीटरसाठी मंजूर झालेला निधी याची तुलना केली, तर राज्यात सर्वात कमी खर्चात उत्तम प्रतीचे रस्ते कर्जत-जामखेडमधील प्रशासनाने करून दाखविले, ही वस्तुस्थिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news