

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नाकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. शेतीविषयक अनेक प्रश्न ऱखडलेले आहे. त्याबाबत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देऊन चर्चा केली आहे. शेतकरी प्रश्न सोडवण्यासह नेवासे येथील संत ज्ञानेश्वर देवस्थानला भरीव निधी देण्याचे शिंदे यांनी अश्वासन दिले असल्याची माहिती शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील शेती व शेतकरी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याबाबत दहातोंडे म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी नेवासे येथे ज्ञानेश्वरी लिहिली. त्यामुळे नेवासे देवस्थानला राज्यात व देशात महत्त्व आहे. मात्र, अद्यापही या संस्थानच्या विकासासाठी भरीव निधी मिळाला नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत शेतकरी मराठा महासंघ व वारकरी महासंघातर्फे चर्चा केली. ज्ञानेश्वर देवस्थानला भरीव निधी दिला जाईल. याबाबत चर्चा करण्यासाठी शेतकरी मराठा महासंघ व वारकरी महासंघाच्या पदाधिकार्यांसोबत बैठकी घेऊन चर्चा केली जाईल. दरम्यान, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मनमानी कारभार सुरू आहे.
पश्चिमेकडील पाणी गोदाखोर्यात वळवा
संभाजी दहातोंडे म्हणाले, नगर जिल्ह्यातील अकोले भागातील पश्चिम घाटावरील समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्यात वळवावे, अशी खूप जुनी मागणी आहे. हे पाणी जर इकडे वळाले, तर दुष्काळाचा प्रश्न सुटू शकतो. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत चर्चा करून प्रश्नमार्गी लागण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.