नान्नज : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात नव्याने खर्डा, साकत, जवळा तीन जिल्हा परिषद गट व नान्नज, खर्डा, शिऊर, साकत, अरणगाव, जवळा ही पंचायत समितीसाठी सहा गण जाहीर झाले असून, याबाबत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. गट आणि गणाविषयी तालुक्यातून एकूण सहा हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत वरिष्ठ काय? निर्णय घेतात याकडे हरकतदारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याचे ज्यांना डोहाळे लागले, अशा सर्व राजकीय इच्छुक उमेदवारांच्या नजरा आता गट, गणांच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. तालुक्यात 2011च्या लोकसंख्येप्रमाणे एकूण लोकसंख्या एक लाख 18 हजार 829 असून, अनुसूचित जातीची लोकसंख्या 16066 आहे, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3092 इतकी आहे.
तालुक्यातील एकूण लोकसंख्येतून नव्याने खर्डा, साकत, जवळा, असे तीन जिल्हा परिषद गट व नान्नज, खर्डा, शिऊर, साकत, अरणगाव, जवळा असे पंचायत समितीचे गण जाहीर करण्यात आले. या गट-गणांच्या पुनर्रचनेमुळे इच्छुक उमेदवारांसह काही राजकारण्यांची मोठी तारांबळ उडाली आहे, तर काही नागरिकांनी आपले गाव दुसर्या गटात किंवा दुसर्या गणात घेण्यात यावीत अशी मागणी घेतलेल्या हरकतीमध्ये केली आहे.
तालुक्यातील हरकती
मुंजेवाडी -1, राजेवाडी -2, कवडगाव/गिरवली -1, शिऊर-1, साकत-1. अशा एकूण सहा हरकती जिल्हाधिकार्यांकडे नागरिकांनी 8 जून अखेर दाखल केल्या असून, याबाबत वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील गण, समाविष्ठ गावे
नान्नज गण : नान्नज, पोतेवाडी, वाघा, पिंपळगाव- उंडा, तरडगाव, वंजारवाडी , दौंडाचीवाडी, सोनेगाव जवळके, धनेगाव, चोभेवाडी, मुंजेवाडी, बोरले, गुरेवाडी, महारूळी अशा 12 ग्रामपंचायत व 15 गावांचा समावेश.
खर्डा गण : खर्डा, नागोबाचीवाडी, मुंगेवाडी, पांढरेवाडी, दरडवाडी, लोणी, आपटी, वाकी बाळगव्हाण, सातेफळ, पिंपळगाव-आळवा, घोडेगाव, अशा आठ ग्रामपंचायत व 12 गावांचा समावेश.
साकत गण : साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, मोहा, सावरगाव, देवदैठण, नाहुली, धामणगाव, जायभायवाडी, दिघोळ, अशा आठ ग्रामपंचायत आणि 11 गावांचा समावेश.
शिऊर गण : शिऊर, नायगाव, तेलंगशी, मोहरी, राजुरी,डोळेवाडी, आनंदवाडी, सारोळा, काटेवाडी, पाडळी, जातेगाव, खुरदैठण, बांधखडक, अशा 11 ग्रामपंचायत आणि 13 गावांचा समावेश.
अरणगाव गण : अरणगाव, पाटेवाडी, डोणगाव, फक्राबाद, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, रत्नापूर, सांगवी, कुसडगाव, सरदवाडी, खांडवी, डिसलेवाडी, धानोरा, वंजारवाडी, झिक्री, अशा नऊ ग्रामपंचायत व 16 गावांचा समावेश.
जवळा गण : जवळा, कवडगाव, गिरवली, पिंपरखेड, हसनाबाद, बावी, हळगाव, चोंडी, आघी, मतेवाडी, राजेवाडी, धोंडपारगाव,अशा 10 ग्रामपंचायत व 12 गावांचा समावेश.