

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी (दि.2) झालेल्या लिलावात कांद्याला सर्वोच्च सतराशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर 417 ट्रक (76495 कांदा गोणी) कांद्याची आवक झाली होती.
झालेल्या लिलावात मोठ्या कांद्यास 1500 ते 1600 हा भाव मिळाला.
पावसाळा सुरू झाल्यापासून घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. बुधवार दि.29 जून रोजी झालेल्या मार्केटला 550 ट्रकद्वारे एक लाख कांदा गोणी इतकी विक्रमी आवक आली होती.
मध्यम मोठा कांदा : 1400 ते 1450 रुपये, मध्यम कांदा : 1300 ते 1350 रुपये, गोल्टी कांदा : 500 ते 700 रुपये, गोल्टा कांदा : 700 ते 1000 रुपये, जोड कांदा व बदला माल : 300 ते 600 ते 800 रुपये, 1/2 लॉट वक्कल : 1650 ते 1700 रुपयांपर्यंत दर मिळाला.