अहमदनगर
नगर : गोविंदपुर्यात रस्त्यावर तळे; नागरिकांकडून मनपाचा निषेध
नगर, पुढारी वृत्तसेवा : गोविंदपुर्यातील शहा कॉलनीत अनेक वर्षांपासून रस्ता खोदून ठेवल्याने पावसाळ्यात चिखल होऊन तळे साचले आहे. त्याचा नागरिकांनी निषेध केला.
शहा कॉलनीतील नागरिकांनी अनेक वेळा महापालिका व नगरसेवकांकडे तक्रारी करून देखील रस्त्याचे काम झाले नाही. रस्त्याला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली असूनही ठेकेदार काम करीत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ज्येष्ठ नागरिक व लहान मुले घसरून पडतात. नागरिकांनी निषेध नोंदवत लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी केली.
दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा काजल मदन, आरती मुलतानी, समीना शेख, अफरोज खान, निशा आमले, ममता सोडी, सीमा वाघमारे, नंदा दाबडे, मीना पंडित, आशा गायकवाड, समीर शेख, संजय आजबे, अश्पाक शेख, आकाश तारू, प्रशांत वारे, राजा गवळी, ईस्माइल शेख आदींनी दिला.

