नगर : कोळगाव छडछाड प्रकरणी अखेर गुन्हे दाखल

police
police
Published on
Updated on

कोळगाव, पुढारी वृत्तसेवा : कोळगाव येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपवरून अखेर बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल कैलास शिपणकर यांनी फिर्याद दाखल केली असून, त्या युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल शिपणकर यांनी सोमववारी रात्री उशिरा कलम 143, 147, 505 (2) 506 प्रमाणे दीपक प्रकाश लगड, बंडू कवडे, नंदकुमार आबासाहेब लगड, कावेरी घोंडगे (महिला) यांच्यासह दहा ते पंधरा लोकांविरुद्ध फिर्याद नोंदविली. त्यामध्ये 5 जुलै 22 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास दौंड ते नगर रस्त्यालगत कोळगाव शिवारात पेट्रोल पंपाजवळ वरील आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून आकाश उर्फ दत्ता विकास कदम याला विविध प्रश्न विचारले. त्याच्या अंगातील शर्ट काढला, त्याचे डोक्याचे केस काढले. 'तरी तुझा कार्यक्रम'च असे बोलून दोन समाजांत शत्रुत्व व द्वेष भावना निर्माण होण्याच्या उद्देशाने बोलताना व्हिडीओ क्लिपमध्ये दिसून आल्याचे म्हटले आहे. यावरून त्या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ज्या युवकाने मुलींची छेड काढली त्याच्याविरुद्धही मंगळवारी 1.39 वाजता फिर्याद नोंदविण्यात आली. त्यानुसार फिर्यादी, तिची चुलत बहीण व मैत्रीण यांनी असे म्हटले आहे की, 5 जुलै 22 रोजी 1.30 वाजण्याच्या सुमारास कोळगाव शिवारातील ओढ्यात, बंधार्‍याजवळ आरोपी आकाश उर्फ दत्ता विकास कदम याने फिर्यादी, तिची चुलत बहीण व मैत्रिणीचा क्लास सुटल्यानंतर घराकडे सायकलवर जात असताना त्यांचा पाठलाग करून मोटारसायकल आडवी लावून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून सिगारेट पेटवून सिगारेटचा धूर तोंडावर फुंकला.

मुलींना उद्देशून अपशब्द वापरून तुम्हाला मी त्रास देईल, असा दम देऊन निघून गेला. असे फिर्यादीत म्हटल्यानुसार कलम 354 (ड), 341, 506, बाल लैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, वरील दोनही गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चाटे करीत आहेत.

या प्रकरणामुळे गेले आठ दिवस राज्य पातळीपर्यंत या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटनांनी पाठपुरावा करून, तसेच प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन अखेर गुन्हा नोंद करण्यास बेलवंडी पोलिसांना भाग पाडले आहे. या प्रकरणामुळे कोळगाव परिसरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news