नगर : करपडीत बिबट्याचा वासरावर हल्ला

नगर : करपडीत बिबट्याचा वासरावर हल्ला

राशीन, पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील करपडी येथील शेतकरी महेश काळे यांच्या गोठ्यातील सहा महिन्यांच्या वासरास बिबट्याने आज (दि. 31) पहाटे तीन वाजता हल्ला करून मारले.

शेतामधील गोठ्यामध्ये सकाळी दूध काढण्यासाठी गेले असता, वासरू दिसले नाही. त्यांनी इतरत्र पाहणी केली असता वासराला चावा घेतल्याचे दिसून आले. भोवताली बिबट्याचे ठसे दिसून आले असल्याचे शेतकरी महेश काळे व दिनेश काळे यांनी सांगितले. त्यांनी तत्काळ करपडीचे माजी सरपंच सुनील काळे यांच्याशी संपर्क साधला. सुनील काळे यांनी त्वरित वनरक्षक सुरेश भोसले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. त्यांनी वनविभागाचा कर्मचारी येऊन पाहणी करेल व पंचनामा करेल, असे त्यांनी सांगितले.

काळे यांनी राशीन येथील पशुवैद्यकीय अधिकारी साळवे यांच्याशीही संपर्क केला. सायंकाळी चार वाजेपर्यंत प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी न आल्याने या शेतकर्‍याच्या वासराचा पंचनामा होऊ शकला नाही. पशुवैद्यकीय अधिकारी साळवे म्हणाले, वनविभागाचा अहवाल असल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. संध्याकाळी आणखीन काही विपरीत घटना घडू नये, लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी सदर वासराचे फोटो काढले. शेवटी वनविभागाचे अधिकारी न आल्याने वनरक्षक भोसले यांनी फोन न उचलल्याने सायंकाळी वासराचा दफनविधी करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news