नगर : ऑनलाईन लॉटरी, जुगार अड्ड्यावर छापे

नगर : ऑनलाईन लॉटरी, जुगार अड्ड्यावर छापे

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 15 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक लाख 40 हजार 480 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ज्ञानेश्वर वसंत तनपुरे, संतोष गुलाबचंद गोयल, राकेश बालराज गुंडू, नीलेश कृष्णा लोखंडे, आनंद लोढा, पंडित पोकळे, शाम बालू अडागळे, विजय लक्ष्मण शिंदे, विकास दिलीप भिंगारदिवे, यासीन रज्जाक शेख, अशोक दामोदर कावळे, रामभाऊ सदाशिव घुले, प्रवीण अनिल टेकाळे, बाबा महेबूब शेख, प्रकाश बबन गायकवाड अशा 15 जणांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अवैधरितीने ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाल्यानंतर शहरात छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, शेख शकील अहमद, सचिन दिलीप धारणकर, कुणाल सुरेश मराठे, प्रमोद सोनू मंडलिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news