नगर : आघाडीची बिघाडी अन् बंडखोरीही! बँकेच्या 21 जागांसाठी 93 उमेदवार

नगर : आघाडीची बिघाडी अन् बंडखोरीही! बँकेच्या 21 जागांसाठी 93 उमेदवार
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा: शिक्षक बँक आणि विकास मंडळासाठी सत्ताधारी गुरुमाऊली, रोहोकले प्रणित गुरुमाऊली, गुरुकूल आणि सदिच्छा आघाडी अशी चौरंगी लढत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सदिच्छा, इब्टा, शिक्षक संघ आणि साजिर या संघटनांनी एकत्र येवून चौथा पर्याय उभा केला आहे. 6 तालुक्यात बंडखोरी झाल्याचे समोर आले. दरम्यान, सोमवारी 707 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने 21 जागांसाठी 93 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विकास मंडळाच्या 18 जागांसाठी 429 जणांनी माघार घेतल्याने 72 अर्ज शिल्लक राहिले.

शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी 799 उमेदवारी अर्ज दाखल होते. सत्ताधारी गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांनी कल्याण रोडवरील कार्यालयात 'वॉर रुम' उभारली होती. रोहोकले गुरुजींचे कार्यालयही सकाळपासून कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलल्याचे पहायला मिळाले. डॉ. कळमकर, आबा जगताप, राजेंद्र शिंदे, एकनाथ व्यवहारे या नेत्यांनीही ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची बैठकीची व्यवस्था केली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच बैठकांची धामधूम सुरू होती.

छोट्या-मोठ्या संघटना जागा वाटपाच्या एकमेकांशी चर्चा करण्यात व्यस्त होते. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वच मंडळांची धावपळ सुरू होती. दुपारी 3 नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. रोहोकले गुरुजींनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. सत्ताधारी गटाचे नेते बापू तांबे हे ऐक्य, शिक्षक भारती, एकलला सोबत घेत निवडणूक रिंगणात उरतले आहेत. डॉ. संजय कळमकर यांनी स्वराज्य संघटनेला गुरुकुलसोबत घेतले आहे. सदिच्छाला सन्मानजनक जागा न मिळाल्याने राजेंद्र शिंदे यांनी इब्टाचे एकनाथ व्यवहारे, शिक्षक संघाचे आबासाहेब जगताप यांच्याशी चर्चा करून चौथी आघाडी तयार केली. दरम्यान, 24 जुलै रोजी मतदान होणार आहे, तर 25 ला मतमोजणी होणार आहे.

पाच तालुक्यांत नाराजांची बंडखोरी
नगर, पारनेर, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी तालुक्यात पाच-पाच उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. तर कॅन्टोमेंट, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासप्रवर्गच्या मतदार संघातही बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले. रात्री उशीरापर्यंत बंडखोरांची मनधरणी करण्याचे काम सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news