

नगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकरणी मुलीनेच इच्छेविरूद्ध लग्न लावल्याची तक्रार दाखल केल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय प्रभाकर साळवे, गीता विजय साळवे, अक्षय सुखदेव मगर, रागिनी संतोष साळवे, संतोष प्रभाकर साळवे, रंजना सुखदेव मगर, सुखदेव मगर (सर्व. रा. खारेकर्जुने, ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नवनागापूरचे ग्रामविकास अधिकारी संजय विश्वनाथ मिसाळ यांच्या फिर्यादीवरून बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.