

संगमनेर विशेष, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील झरेकाठीसह परिसरात धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणारा 'तो' बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात काल पहाटे अलगत जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःस्वास सोडला आहे. दरम्यान, अजूनही काही बिबटे या परिसरात धुमाकूळ घालीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या बिबट्यांचाही वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
झरेकाठी येथील सोमनाथ भागवत डोळे यांच्या वस्तीजवळ गट नंबर 19 मध्ये गिन्नी गवताच्या शेतात वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. मात्र, बिबट्या पिंजर्याला हुलकावणी देत होता. अखेर काल पहाटे बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला. गेल्या अनेक दिवसांपासून डोळे वस्तीवर बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. रविवारी पहाटे 4 वाजता बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला.