

खरवंडी कासार, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक व ग्रामस्थांचे होल होत होते. रस्त्याची डागडुजी करण्याच्या मागणीची दखल घेऊन आमदार मोनिका राजळे यांनी निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामास काल प्रारंभ केला.
आमदार राजळे यांच्या प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2021 – 2022 मधून राष्ट्रीय महामार्ग 361 ते खरवंडी कासार स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी सरपंच प्रदीप पाटील, वृद्धेश्वर साखर कारखान्याचे सचांलक बाळासाहेब गोल्हार, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, तालुका महिलाध्यक्षा काशीबाई गोल्हार, सेवा सोसायटीचे चेअरमन भगवान दराडे, उपाध्यक्ष दीपक पाटील, अशोक खरमाटे, अंकुश कासुळे, वामन कीर्तने, शरद दहिफळे, सजंय किर्तने, भाजप अल्पसख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रशीद तांबोळी, योगेश अंदुरे, मिथून डोगंरे, दीपक ढाकणे, सुरेश केळग्रंदे, महेश बोरुडे, माणिक अंदुरे, भाऊसाहेब सांगळे, बबन अंदुरे, माणिक बटुळे, दतात्रय पठाडे, सोमनाथ अंदुरेे आदी उपस्थित होते.
खरवंडी कासार येथील राष्ट्रीय महामार्ग 361 ते खरवंडी कासार स्मशान भूमी या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाली होती. अंत्यविधीसाठ ीखरवंडी परवड हे वृत्त 'पुढारी'ने प्रकाशित केले होते. त्यानंतर सरपंच प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी आमदार राजळे यांची भेट घेऊन या रस्त्याची मागणी केली होती. त्यामुळे राजळे यांच्या प्रयत्नांमधून जिल्हा नियोजन च्या निधीमधून मंजूर झालेल्या खरवंडी कासार स्मशानभूमी रस्ताकामाचे भूमिपूजन झाले.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांच्या माध्यमातून स्मशानभूमी शेड मंजूर होऊन त्यांचे भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे स्मशानभूमी शेडचाही प्रश्न मिटणार आहे 'पुढारी' व ग्रामस्थ, कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे आता खरवंडीकरांची अंत्यविधीसाठी होणार परवड थांबणार आहे. दरम्यान, स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याची दुरुस्ती होणार असल्याने ग्रामस्थांना आमदार राजळे यांना धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले आहे.
आमदार राजळे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या रस्ताकामाच्या कार्यक्रमाला मनसे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर हे आवर्जून उपस्थित राहिल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांमध्ये निवडणुकीच्या रणनीतीची परिसरात चर्चा झाली. यापूर्वी एकनाथवाडी येथील सेवा सस्थेत भाजप-मनसे ने एकत्रित निवडणूक लढविली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पाथर्डी तालुक्यात हा प्रयोग केला जातो की काय याबाबत उपस्थित कुजबुजत होते.
राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यामुळे प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील. मंत्रिमडंळ विस्तारात ज्येष्ठांना संधी मिळाली. पावसाळी अधिवेशनानंतर महिलांचाही मंत्रिमडंळात समावेश होईल. मंत्री म्हणून संधी मिळो न मिळो एक लोकप्रतिनिधी म्हणून या भागातील प्रश्शन सोडवण्यासाठी प्रयत्न आहेत.
– मोनिका राजळे, आमदार