

जामखेड /कर्जत : पुढारी वृत्तसेवा : बारामती येथे अखिल भारतीय पातळीवर सृजन भजन स्पर्धा आयोजित केली असून, 7 ऑगस्ट रोजी अंतिम फेरी होणार आहे. महाराष्ट्रासह 7 राज्यांतील गायकांना पर्वणी असणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
आमदार पवार म्हणाले, संगीत क्षेत्रात महाराष्ट्रस्तरावरील सृजन भजन स्पर्धा यंदा अखिल भारतीय पातळीवर जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधील शारदानगर येथे 7 ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील सात राज्यांतील गायकांसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पाच वर्षांपूर्वी सृजन भजन स्पर्धा जिल्हास्तरावर सुरू झाली. त्यानंतर पुणे, सातारा, नगर विभागीय पातळीवर तिचे आयोजन करण्यात आले.
कर्जत-जामखेड विभाग स्पर्धा
कर्जत-जामखेड मतदारसंघातील गायकांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला असून, प्रथम क्रमांकाला 15 हजार, द्वितीय 10 हजार, तर तृतीय क्रमांकाला पाच हजारांचे पारितोषिक, अंतिम फेरीतील विजेते तीन क्रमांक वगळून इतर सात संघांना प्रत्येकी दोन हजार उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार.