

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील 30 वर्षीय युवकाने शहरातील प्रसाद लॉज मध्ये स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली.
सागर रघुनाथ ठाकरे (रा. ओम नगर किरण सोसायटी देवपूर, जिल्हा धुळे) असे या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती असजी की, गेल्या दोन दिवसांपासून हा युवक या लॉजमध्ये रूम घेऊन राहत होता.
दरम्यान गुरुवारी मध्यरात्री त्याने रूमचा दरवाजा बंद करीत स्वतःला रूममध्ये पेटून घेतले. दुसर्या दिवशी सकाळी लॉजमधील दरवाजातून धूर येत असल्यामुळे कर्मचार्यांनी दरवाजा उघडला असता आगीत या युवकाचा अक्षरश कोळसा झाला होता. हा युवक उच्चशिक्षित असून घरगुती वादातून त्यांने आत्महत्या केले असावी,
असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मयत युवकाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती. चिट्ठीसह इतर सर्व कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. दरम्यान या युवकाने आत्महत्या का केली? याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलिस करीत आहेत.