जिंकलो !!!! माझी वसुंधरा स्पर्धेचे बक्षीस वितरण, कर्जत नगरपंचायत प्रथम

कर्जत : माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीला प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल जल्लोष करताना कार्यकर्ते.
कर्जत : माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीला प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल जल्लोष करताना कार्यकर्ते.
Published on
Updated on

कर्जत : पुढारी वृत्तसेवा

माझी वसुंधरा 2 अभियान स्पर्धेचा निकाल काल मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आला. यामध्ये नगरपंचायत गटात कर्जत नगरपंचायतने राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत कर्जत तालुक्याच्या इतिहासात आणखी एक सुवर्णाक्षरांनी पान लिहिले. या पुरस्काराचे श्रेय शहरात सलग श्रमदान करणार्‍या सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांना देण्यात येते. हा पुरस्कार मिळाल्यानंतर कर्जत येथे सर्व सामाजिक संघटना व नगर पंचायत कर्मचार्‍यांनी मोठा जल्लोष करीत भंडारा उधळत व फुलांचा वर्षाव करत शहरातून फेरी काढली.

माझी वसुंधरा अभियानाच्या दुसर्‍या वर्षाचा बक्षीस वितरण समारंभ मुंबई येथे झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आदीसह अनेक मान्यवरांंच्या उपस्थितीत झालेल्या बक्षीस वितरण समारंभात कर्जत नगरपंचायतला नगरपंचायत गटातील पहिला क्रमांक मिळाला. याशिवाय भूमी या गटात अतिउत्कृष्ट काम केल्याबद्दलही गौरविण्यात आले.

हा सन्मान नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, छाया शेलार, ज्योती शेळके, भास्कर भैलुमे, संतोष म्हेत्रे, श्रमप्रेमी अनिल तोरडमल, श्रमप्रेमी विशाल म्हेत्रे, श्रमप्रेमी मुन्ना पठाण, सचिन घुले, सुनील शेलार आदींच्या टीमने स्वीकारला.

कर्जत पंचायत समिती सभागृहात एकत्रित पुरस्कार वितरण समारंभ पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेव राऊत, प्रतिभा भैलूमे, सतीश पाटील, अभय बोरा, भाऊसाहेब तोरडमल, अमृत काळदाते, रज्जाक झारेकरी, ताराबाई कुलथे, आश्विनी दळवी, मनीषा सोनमाळी, अजय भैलुमे, ओंकार तोटे, हर्षदा काळदाते, रवींद्र सुपेकर आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक संघटनाचे दत्तात्रय कोपनर, नितीन देशमुख, काकासाहेब काकडे, घनश्याम नाळे, सुनील साळुंके, भाऊसाहेब रानमाळ, सत्यजित मच्छिन्द्र, आशिष बोरा, मनीषा सोनमाळी, राजकुमार चौरे यांनी मनोगत व्यक्त केले.

एकजुटीतून मिळाला पुरस्कार
नगराध्यक्षा उषा राऊत यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त कर्जत नगरपंचायतने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. कोणतेही काम समुहाशिवाय शक्य नाही. त्यामुळे नगरपंचायतीच्या सर्व कर्मचार्‍यांबरोबरच, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व सहकारी मुख्याधिकारी गोविंद जाधव, सर्व सामाजिक संघटना, आम्ही कर्जतचे सेवेकरी, कर्जतकर सर्वांनी मिळून कर्जत शहर हे स्वच्छ, सुंदर करण्याच चंगच बांधला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news