जामखेडमध्ये खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

जामखेडमध्ये खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात अद्यापि दमदार आणि पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. खरीप पेरणीपूर्व मशागती देखील झाल्या आहेत. परंतु पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील जवळा, हळगाव, अरणगाव, पिंपरखेड, खांडवी , बावी, चौंडी, नान्नज, धोंड पारगाव, राजेवाडी, झिक्री सोनेगाव, आदी भागात उडीद, तूर काही प्रमाणात कापूस ही पिके घेतली जातात. या सर्व पिकांच्या पेरणीसाठी वेळेवर पावसाची गरज असते. मान्सून उशिरा र्आला, तर या भागातील पिकांच्या उत्पादनात देखील घट होते.

तसेच खर्डा, दिघोळ, साकत, जातेगाव, सावरगाव, मोहरीसह या भागात सोयाबीन, उडीद या पिकांची पेरणी करीत असतात. परंतु पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. खरीप पेरणीसाठी खते आणि बियाण्यांची खरेदी शेतकर्‍यांची झाली असून आता फक्त पावसाची वाट पाहत आहे. तालुक्यात दमदार पाऊस कधी पडेल, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना सतावू लागली आहे . मान्सून सुरू होऊन आठवडा लोटला तरी अनेक भागांत पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही .

कृषी विभागाने लागणारे बियाणे आणि खतांची उपलब्धता करुन ठेवली आहे. मागील वर्षी खरिपाच्या पेरण्या सुरु झाल्या होत्या. परंतु यावर्षी आजून रिमझिम पाऊस झाला नाही. यंदाही खरिपाचे क्षेत्र वाढणार असा विश्वास कृषी विभागाला आहे. मात्र , पावसाळा सुरू होऊन आठवडा लोटला तरी तालुक्यात कोठेही दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यातील पावसाअभावी पेरण्या खोळबल्या आहेत. सुसाट वारे वाहत असल्याने शेतकरी मात्र चिंचातूर झाले आहेत.

तालुक्यात एकूण 89 गावे असून, भौगोलिक क्षेत्र 87 हजार 524 इतके क्षेत्र असून, त्यामध्ये खरीप पेरणीसाठी 60 हजार 993 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. यंदा सोयाबीन, उडीद, मूग, सूर्यफूल, तूर, बाजरी या पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. यासाठी लागणार्‍या रासायनिक खतांची उपलब्धता कृषी विभगाच्यावतीने करण्यात आलेली आहे.

तालुक्यात 60 हजार हेक्टरवर खरीप पेरणीची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्यास हंगामच धोक्याते येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर हिरमुड झाल्याचे दिसत आहे. पाऊस जर लांबला , तर पेरण्याही लांबण्याची शक्यता आहे . पेरण्या पुढे गेल्यास खरीप हंगामच पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा आता पुरता चिंचातूर झाला आहे.

हवामान अंदाच चुकत असल्याने शेतकरी संभ्रमात
यावर्षी हवामान खात्याचे अंदाज सतत चुकत असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. सुरुवातीला मान्सून 10 दिवस आगोदर येणार म्हणून गवगवा झाला, त्यांनतर मान्सून ची संथ गतीने सुरु असून 13 जून च्या दरम्यान जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले पण तसेही काही झालेले दिसत नाही. त्यामुळे वेळोवेळी मान्सून पाऊस हा हुलकावणी देत असल्याने हवामान खात्यासह शेतकरी देखील संभ्रमात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news