जमावाला भडकावणार्‍यांना अटक करण्याची बजरंग दलाची मागणी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जमावाला भडकावणार्‍यांना अटक करण्याची बजरंग दलाची मागणी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नगर : पुढारी वृत्तसेवा: श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर इस्लामिक जिहादींनी शंभरहून अधिक ठिकाणी हल्ले केले. गेल्या काही दिवसांपासून हिंदू समाजावर कोणत्याही बहाण्याने हल्ले, दगडफेक, जाळपोळ व लूटमार असे प्रकार सातत्याने घडत आहेत. घटनेच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

विषारी भाषणे देऊन जमावाला भडकावणार्‍यांना अटक करा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. देशात वाढणार्‍या इस्लामिक जिहादी कटटरपंथीयाच्या अतिरेकी घटनांविरोधात विश्व हिंदू परिषदेची युवाशाखा बजरंगदल आता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा बजरंग दलाचे मुंबई क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला. शुक्रवारच्या नमाजानंतर ज्या मशिदीमधून जमाव आणि दंगलखोर बाहेर पडतात. त्या मशिदींवर कडक नजर ठेवा. जमावाला भडकवणार्‍या तत्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा.

ज्यांना धमकावले जात आहे. त्यांच्या सुरक्षेची खात्री करुन, या धमक्या देणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. हिंदू समाजावर सातत्याने हल्ले, दगडफेक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे हिंदू समाज संतप्त झाला आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.16) राज्यभर निदर्शने करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानुसार विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना बजरंग दलाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी विहिंपचे जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश बायड, प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख मिलिंद मोभारकर, शहराध्यक्ष विजयकुमार पादीर, जिल्हा सहमंत्री गजेंद्र सोनावणे आदींसह बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news