

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहेत. मी सांगेल ते ऐक, असे म्हणून 40 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना दिनांक 28 जून रोजी राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथे घडली. एका 40 वर्षीय विवाहित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 28 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास विवाहित महिला घरात एकटीच होती.
त्यावेळी आरोपी सोपान कोळसे तेथे आला आणि म्हणाला की, मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहे. मी सांगेल ते ऐक, असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यावेळी त्या महिलेने आरडाओरड केला असता आरोपी सोपान कोळसे याने शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तू जर माझे ऐकले नाहीतर, तूझा बेतच पाहतो, अशी धमकी दिली.
घडलेल्या प्रकारानंतर त्या विवाहित महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी सोपान भागवत कोळसे (रा. गडदे आखाडा, ता. राहुरी) याच्यावर विनयभंग व धक्काबुक्की करून दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास हवालदार जानकीराम खेमनर हे करीत आहेत. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यावर पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलने गरजेचे आहे.