‘खेलो इंडिया’ मध्ये ‘ध्रुव’ला 11 सुवर्ण, योगासन खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

‘खेलो इंडिया’ मध्ये ‘ध्रुव’ला 11 सुवर्ण, योगासन खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा

हरियाणातील पंचकुला येथे सुरू असलेल्या चौथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत योगासन खेळात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी गोवा संघाच्या विरोधात लढत बाजी मारली असून 11 सुवर्ण पदके पटकविली.
हरियाणा राज्यातील पंचकुला येथील तावू देवीलाल क्रीडा संकुलामध्ये 4 जूनपासून खेलोइंडिया युथ गेम्स् सुरू आहेत.

यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत योगासनांचा समावेश करण्यात आला. यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूलने राज्याच्या कानाकोपर्‍यातून योगासनपटू निवडून आणले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना प्रशिक्षण देत योगासनांचा सराव करुन घेण्यात आला. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून सहभागी झालेल्या एकूण 22 योगासनपटूंमध्ये संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या 20 जणांचा समावेश आहे.

खेलो इंडिया स्पर्धेतील योगासनांमध्ये महाराष्ट्राने 6, गोव्याने 2 व हरियाणाच्या संघाने 1 सुवर्णपदके मिळविले. तब्बल 7 सुवर्णपदके संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगा सनपटूंनी प्राप्त केले. पारंपरिक योगासनांमध्ये सुमीत बंडाळे याने सुवर्ण तर तन्वी रेडीज हिने रौप्यपदक मिळवून पदकतालिकेत महाराष्ट्राचे खाते उघडले.

आर्टिस्टिक एकेरी प्रकारात रुपेश सांगे व गोव्याकडून खेळलेल्या ध्रुवच्या निरल वाडेकरने सुवर्ण, प्रांजल व्हाना हिने रौप्य तर रुद्राक्षी भावेने कांस्य पदकं मिळविले. दुहेरी प्रकारात वैदेही मयेकर व युगांका राजमने मुली गट तर आर्यन खरात व निबोध पाटील यांनी मुले गटात सुवर्ण मिळविले.

कठोर परिश्रमांचे फळ मिळाले : डॉ. मालपाणी

गेल्या पाच वर्षांपासून हे खेळाडू आणि प्रशिक्षक जीवतोड परिश्रम घेत आहेत. मागील दोन वर्षे कोविड संसर्ग असतानाही या सर्वांनी बायो बबलमध्ये राहून मंगेश खोपकर, स्वप्निल जाधव, प्रवीण पाटील व किरण वाडेकर या चारही प्रशिक्षकांनी कठोर परिश्रम घेऊन गेली चार वर्षे प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या ध्रुव ग्लोबलच्या योगासन पटूंनी शाळेची आणि संगमनेरकरांची मान उंचावल्याचे ध्रुव ग्लोबलचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news