कोपरगाव : नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग घटविला

कोपरगाव : नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग घटविला

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : गोदावरी नदीला नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यातून शुक्रवारी सकाळी 8 वाजता 32 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत आठ धरणे शंभर टक्के भरले आहेत. 14 जुलै रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढील प्रमाणे तर कंसातील आकडे आजपर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. जायकवाडी नाथसागरात गोदावरीतून आतापर्यंत 8 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यांचा उपयुक्त पाण्याचा साठा 41 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दारणा 35 (655), गंगापूर 60 (1954), मुकणे 17 (626), कडवा 34 (534), काश्यपी 44 (850), भावली 75 (782), वालदेवी 36 (411), गौतमी 107 (933), वाकी 93 (1059), नांदुर मध्यमेश्वर 1 (240), नाशिक 21 (533), जंबकेश्वर 86 (1105), ईगतपुरी 172 (1888), देवगाव 2 (230), ब्राम्हणगाव 0(196), कोपरगाव 1(150), पढेगाव 0 (146), सोमठाणा 0 (332), कोळगाव 2 (318), शिर्डी 0 (149), सोनेवाडी 0 (176), रांजणगांव खुर्द 2 (171), चितळी (183), राहाता 0 (248), पालखेड 3 (366) याप्रमाणे पाऊस झाला आहे.
धरणातील पाणीसाठे दशलक्ष घनफुटात पुढील प्रमाणे – दारणा 5645, गंगापूर 3512, मुकणे 5260, कडवा 1180, काश्यपी 1265, भावली 1434, वालदेवी 1133, गौतमी 1522, वाकी 1156 पालखेड 322 याप्रमाणे पाणीसाठा आहे.

कोपरगाव तालुका परिसरात पावसाने उघडीप दिली आहे. आता शेतकर्‍यांनी पेरण्यांना वेग घेतला आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमधील धरण हाऊसफुल्ल झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news