केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कर्जतमध्ये दाखल, वैयक्तिक वादातून युवकावरील हल्ला प्रकरणाला जातीय रंग

केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कर्जतमध्ये दाखल, वैयक्तिक वादातून युवकावरील हल्ला प्रकरणाला जातीय रंग

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : नुपूर शर्मा समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने तरुणावर झालेल्या हल्ला प्रकरणाचा तपास करण्याकरीता केंद्रीय गुप्तचर विभागाचे तीन अधिकारी कर्जतमध्ये दाखल झाले. या पथकाने स्थानिक पोलिसांकडून घटनेची माहिती घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान याप्रकरणी नगर पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. त्यातील पाच जणांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. तसेच यापूर्वी अटक केलेल्या आरोपींकडून नुपूर शर्मा, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, इतर आरोपींचा सहभाग, मारहाणीचे नेमके कारण, यासह इतर सर्व बाबींचा सखोल तपास करण्यासाठी पाच आरोपींना न्यायालयाने पोलिसांना शारीरिक ताबेदारी (पीसी) दिली आहे.
या घटनेच्या तपासासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी शनिवारी रात्री कर्जत शहरात दाखल झाले असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनेदेखील या घटनेचा तपास सुरू केला आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत येथील सनी पवार या युवकाला शहरातील अक्काबाई मंदिर परिसरात तलवार व इतर हत्यारांच्या सहाय्याने जबर मारहाण करून गंभीररित्या जखमी करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये राजेंद्र माने यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले होते की, सनी पवार यास, तू आय सपोर्ट शर्मा, असे स्टेटस ठेवतो, इंस्टाग्राम वरही टाकतो, तुला हिंदूंचा फार कीडा आला आहे, तुझा उमेश कोल्हे करणार, असे म्हणून मारहाण केल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर कर्जत शहरात हिंदू संघटनांनी बंदची हाक दिली होती. शुक्रवारी कर्जत शहर कडकडीत बंद होते.

शनिवारी नगरपंचायत कार्यालयाबाहेर कर्जत शहरातील सर्व प्रमुख पक्षाचे राजकीय नेते, व्यापारी, विविध संघटनांचे प्रमुख आणि नागरिकांनी बैठक घेऊन हे प्रकरण वैयक्तिक वादाचे असून इतर मुद्दे उपस्थित करून बाहेरच्या व्यक्तींनी कर्जत शहराची शांतता बिघडू नये, असे आवाहन केले होते.

या घटनेनंतर कर्जत पोलिस पथक, स्थानिक गुन्हे शाखेने एकत्रित तपास करीत या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी शाहरुख आरिफ पठाण (वय 28, रा. लोहारगल्ली), इलाई महबूब शेख (वय 20, रा. लोहारगल्ली कर्जत), आकिब कुदरत सय्यद (वय 24, रा. हनुमानगल्ली, कर्जत), टिपू सरीम पठाण (वय 18, रा. लोहारगल्ली), साहिल शौकत पठाण (वय 23, रा. लोहारगल्ली कर्जत), हर्षद शरीफ पठाण (वय 20, रा. लोहारगल्ली, कर्जत), निहाल इब्राहिम पठाण (वय 20, रा. हनुमानगल्ली, कर्जत), एक अल्पवयीन बालक; यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. एकूण अटकेतील आरोपींची संख्या 14 झाली आहे.

घटनास्थळाची पाहणी
या घटनेनंतर शनिवारी कर्जत शहरात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे तीन अधिकारी तपासासाठी आले आहेत. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यंत्रणेने काही जणांच्या भेटी घेतल्या आहेत. हे अधिकारी सखोल चौकशी करीत असून, कर्जत शहरात ठाण मांडून बसले आहेत.

पाच जणांची शारीरिक ताबेदारी
या प्रकरणी सोहेल शौकत पठाण (वय 28, रा. लोहारगल्ली, कर्जत), अब्रार उर्फ अरबाज कासम पठाण (वय 25, रा. लोहारगल्ली, कर्जत), जुनैद जावेद पठाण (वय 19, रा. पोस्ट ऑफिसमागे), हुसेन कासम शेख (वय 40, रा. पिंपळे गुरव, कासिद बिल्डींग, पुणे), अरबाज अजिज शेख (वय 24, रा. पारगाव, दौंड जि. पुणे) यांना न्यायालयाने पोलिसांकडे शारीरिक ताबेदारी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news