नगर : भीक न दिल्याने महिलेला मारहाण

नगर : भीक न दिल्याने महिलेला मारहाण

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवसा फाटा परिसरातील आंबेडकर चौकात भिक मागणार्‍या लहान मुलांना भिक न दिल्याने भर रस्त्यावर प्रवासी महिलेला आमानुष मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे भिक मागण्यार्‍या टोळीकडून लहान मुलांना भिक मागण्यासाठी लावले जात आहे. या टोळीकडून त्या महिलेला मारहाण करण्यात आली. यावेळी चौकात मोठी गर्दी झाली होती.  नेवासा फाटा येथे शनि शिंगणापूर, शिर्डी, तसेच औरंगाबादकडे जाणार्‍या येणार्‍या वाहनांची संख्या अधिक असते. यामुळे नेवासा फाटा परिसरात अनेक हॉटेल आहेत. यावेळी प्रवाशी मोठ्या प्रमाणात येथे थांबतात.

याचा फायदा घेत भिकमाणार्‍या टोळीकडून अल्पवयीन मुलांना भिक मागण्यासाठी लावले जात आहे. ही अल्पवयीन मुले भिक मागण्यासाठी दररोज रस्त्यावर येवून दयामया करत, पैसे मागत फिरताना दिसून येतात. शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान आंबेडकर चौकात नेवाशाला जाण्यासाठी एक महिला प्रवासी वाहतूक करणार्‍या गाडीत बसलेली होती. तितक्यात भिक मागणारा अल्पवयीन मुलांची टोळी या महिलेला भिक मागत होती. या प्रवासी महिलेने पैसे न दिल्याने ही मुले त्या महिलेच्या पाया पडू लागली.
तरीही महिलेने पैसे न दिल्याने भिक मागणार्‍या या मुलांकडून महिलेला अरवाच्या भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे संबंधित महिलाचा अपमान झाल्याने तिने या मुलांना चांगलेच सुनावले. हा प्रकार सुरू असताना त्यांना भिक मागायला लावणार्‍या टोळीतील काही महिला, पुरुष घटनास्थळी आले. यावेळी भिक न देणार्‍या महिलेला चांगलीच धक्काबुक्की त्यांच्याकडून करण्यात आली. तसेच, महिलेला मारहाणही करण्यात आली. हा सर्व प्रकार घडत असताना बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मात्र, भिकार्‍यांच्या दहशतीमुळे कोणीही महिलेला सोवडले नाही.

भिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

नेवासा फाटा येथील राजमुद्रा आणि आंबेडकर चौकात भिक मागण्यासाठी परिसरातील बालके रस्त्यावर फिरून व्यावसायिकांसह प्रवाश्यांना दररोज वैताग देतांना दिसून येत आहेत. आठ ते दहा वर्षांच्या वयातील ही मुले जाणीवपूर्वक रस्त्यावर पाठवली जातात. ही मुले भिक घेण्सासाठी प्रवाशांच्या मागेच लागतात. जर पैसे दिले नाही, तर शिव्याही देतात. अशा घटना वारंवार घडत आहेत. पैस दिले नाही, तर भिकार्‍यांची टोळी रस्त्यावर येवून हाणामार्‍यापर्यंत मजल मारतात. यामुळे या भिकार्‍यांच्या उपद्व्यापातून सर्वसामान्य प्रवाशांची सुटका होण्यासाठी पोलिसासह ग्रामपंचायतीने बंदोबस्त करण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे.

सोंग घेऊन पैशांची मागणी

अल्पवयीन मुलांना भिकार्‍यांचे सोंग घेऊन प्रवाशांसह व्यावसायिकांकडे पैसे मागण्यासाठी सोडले जात असल्याने प्रवासी वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडून प्रवाशांना विनाकारण अपमानित होण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे या भिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news