Maharashtra Assembly polls|Vitthalrao Langhe
विठ्ठलराव लंघे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

भाजपचे विठ्ठलराव लंघे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी

Maharashtra Assembly polls|Vitthalrao Langhe : ..अखेर नेवासा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे
Published on

नेवासा : नेवासा विधानसभा मतदारसंघ अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून सोमवारी (दि.२८) उमेदवारी जाहीर करण्यात आली. मंगळवारी लंघे हे भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Maharashtra Assembly polls|Vitthalrao Langhe
Kedar Dighe : केदार दिघे यांनी कोपरी पाचपाखाडी येथून भरला उमेदवारी अर्ज

नेवाशातून भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व शिंदे गटाकडून उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच चालू असतानाच रात्री उशिरा अचानकपणे विठ्ठलराव लंघे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे मतदार संघात खळबळ उडाली आहे. या उमेदवारीमुळे नेवासा तालुक्‍यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

नेवासा तालुक्‍यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेले विठ्ठलराव लंघे हे भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष असून नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी २००४ मध्ये नरेंद्र घुले पाटील यांच्या विरुद्ध तर २००९ मध्ये शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध भाजपाचे तिकिटावर निवडणूक लढविली होती. दोन्ही वेळेस त्यांना थोड्या मताने पराभव पत्करावा लागला होता. २००९ मध्ये शंकरराव गडाख नेवासा स्वतंत्र मतदार संघाचे आमदार झाल्यानंतर लंघे यांनी गडाख गटामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपताच त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये आणि नंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून जिल्ह्यामध्ये परिचित आहेत.

नेवासा विधानसभा मतदार संघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आ.शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध प्रबळ उमेदवारीचे दावेदार म्हणून शिवसेनेकडून उद्योजक प्रभाकर शिंदे तर भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे व इतर भाजपचे कार्यकर्ते उत्सुक होते. लंघे, मुरकुटे व शिंदे यांच्यात तिकीटासाठी रस्सीखेच सुरु होती. त्याकरिता सर्वजण मुंबईमध्ये ठाण मांडून होते. सोमवारी (दि.२८) माजी आमदार मुरकुटे यांनी भाजप, शिवसेना व अपक्ष असे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, शिंदे व लंघे हे एकनाथ शिंदे व भाजप नेत्यांचे निर्णयाची वाट पाहत थांबून होते. अखेर शेवटच्या क्षणी विठ्ठलराव लंघे यांना शिवसेनेने तिकीट जाहीर करण्यात आले. आता लंघे यांना भाजपाला सोडचिठी देऊन शिवसेनेत प्रवेश करावा लागणार आहे.

मंगळवार (दि.२९) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विठ्ठल लंघे हे मंगळवारी उमेदवार अर्ज दाखल करतील. लंघेच्या उमेदवारीने मतदार संघातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. उद्योजक प्रभाकर शिंदे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या भुमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

Maharashtra Assembly polls|Vitthalrao Langhe
काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद 'वंचित'च्या गळाला; मध्य नागपूरमधून उमेदवारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news